
भंडारा दि.17-: आज संपूर्ण देशात कोरोना महामारी मुळे बेरोजगारी ही अतिशय गंभीर समस्या बनली आहे. भारतात तीस करोड पेक्षा जास्त लोक बेरोजगार आहेत. देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून आपला कार्यभार सांभाळला. त्यावेळी मात्र त्यांनी प्रत्येक वर्षी दोन करोड युवकांना रोजगार देण्याबद्दल घोषणा केली होती. परंतु मागच्या 6 वर्षापासून भारतात युवकांना रोजगार मिळने सोडून, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढले. परिणाम स्वरूप युवकांमध्ये अपराध, नैराश्य पोटी आत्महत्या, अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. देशांमध्ये सध्या लाखो सुशिक्षित, बेरोजगार आहेत. त्यांना त्यांचा रोजगार मिळण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. काय देशातील युवक लोकतांत्रिक सरकार कडून इतकी पण अपेक्षा करणार नाही ? काय देशातल्या नागरिकांना स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उचलने सुद्धा एक अपराध आहे? आपल्या हक्कासाठी आवाज उठवणे हा सर्वांचा मूलभूत अधिकार आहे.
कोरोना महामारी मूळे देशात 12 करोड पेक्षा अधिक लोकांची नौकरी गेलेली आहे. या नंतर सुद्धा केंद्र सरकारच्या विभिन्न विभागात 10 लाख पेक्षा अधिक रिक्त पदांवर बंदी घातली आहे. यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी “रोजगार दो” या अभियानाला सुरुवात भंडारा जिल्ह्यातुन केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारच्या या बेजबाबदार धोरणाचा विरोध करून युवकांना रोजगार देण्यासंबंधी निवेदन दिले. यानंतर सनफ्लॅग व अशोकलेलॅण्ड या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून स्थानिक युवकांना तेथे समाविष्ट करण्यासंबंधी विनंती केली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मोहन पंचभाई, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव जिया पटेल भंडारा जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश कारेमोरे, भंडारा जिल्हा NSUI अध्यक्ष पवन वंजारी, भंडारा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, प्रदेश समन्वयक अनुसूचित जाती विभाग डॉ.विनोद भोयर, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव तथा निरीक्षक भंडारा धनंजय तिरपुडे, जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे सशीर वंजारी, जिल्हा महासचिव राजपुर राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव अजित सिंग, भंडारा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष भुषण टेंभुर्णे , साकोली विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विष्णू रणदिवे, भंडारा विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सचिन फाले , भंडारा शहर युवक काँग्रेस अध्यक्ष शाहीन मुन, भंडारा जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष शैलेश पडोळे, लाखांदूर युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रकाश देशमुख, साकोली तालुका अध्यक्ष नरेश करंजेकर , मोहाडी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश काकडे ,भंडारा जिल्हा युवक काँग्रेस महासचिव मुकुंद साखरकर, भंडारा जिल्हा युवक काँग्रेस महासचिव अय्युब पटेल, भंडारा तालुका काँग्रेस उपाध्यक्ष मंगेश हुमाणे, प्रतीक फुलसूंगे, प्रदीप देकाटे, अमित खोब्रागडे, आकाश बोंद्रे, सुरेंद्र चिंदालोरे, कमल साठवणे, प्रफुल बिसने, निखिल तिजारे, शिवेश कडव, जयंत बोटकुले, रोहित माकडे, विजय दुबे , ओम गायकवाड, विक्की राऊत , अमित पारधी, राजेश तलमले, आनंद चिंचखेडे, प्रतिक कडंबे, मोहित धुर्वे , साहिल मेश्राम , रोशन केसलकर, चाँद डोंगरे, रोहित नागपुरे, साहिल हुमाणे, अर्पित मेश्राम व अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भंडारा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राकेश कारेमोरे, संचालन भंडारा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष भुषण टेंभुर्णे, तर आभार प्रदर्शन विष्णू रणदिवे यांनी केले.





