
गोंदिया,दि.21ः महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज 21 ऑगस्ट रोजी शुक्रवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते.वास्तविक मुख्यमंत्री असताना फडणवीस जेव्हाही गोंदियाला आले ते प्रचारासाठीच शासकीय कार्यक्रमात किंवा शासकीय आढावा घ्यायला ते आलेच नव्हते.त्यानंतर राज्यातील सत्ता हातातून गेल्यावर विरोधी पक्षनेत्याचा मान त्यांना मिळाला आणि ते विरोधी पक्ष नेता म्हणून गोंदिया जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी येणार होते.परंतु निसर्गाने त्यांचा हा दौरा सुध्दा जोरदार पावसामुळे रद्द करावयास लावला आहे.सत्तेवर असतानाही ते शासकीय आढाव्यासाठी येऊ शकले नव्हते तर आता विरोधी पक्ष नेते म्हणून असतानाही त्यांना पावसाने येऊ दिले नसल्याचे बोलले जात आहे.त्यातच शिवसेनेनेही त्यांच्या दौर्यावर टिका केली होती.





