

भडारा दि.02 : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, आपती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन तसेच खान जमीन विकासमंत्री विजय वडेट्टीवार हे 3 व 4 सप्टेंबर 2020 रोजी भंडारा जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आगमन व राखीव, सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक व शासकीय विश्रामगृह भंडारा येथे मुक्काम.4 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 9 ते 12 भंडारा जिल्हयातील पुरग्रस्त भागाची पाहणी व सोयीनुसार नागपूर येथे प्रस्थान करतील.




