39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता लहान भावाने पाडला मोठ्या भावाचा मुडदा

लहान भावाने पाडला मोठ्या भावाचा मुडदा

0
2416

blank

चिचगड,दि.08ःदारूचा व्यसन व उद्धवस्त होणारे कुटुंब याचे अनेक उदाहरण समाजात बघावयास मिळतात. त्यातच मानवी
नात्यालाही कलंविंâत करण्याचा प्रकार दारूमुळे घडले आहे.असाच प्रकार दारुच्या व्यसनाने उद्धवस्त झालेल्या लहान भावाने सख्या मोठ्या भावाचा लोखंडी सबडीने डोक्यावर प्रहार करून त्याचा मुडदा पाडल्याची घटनाची देवरी तालुक्यातील चिचगड पोलिस ठाण्यांतर्गत येणाNया बोदालदंड येथे काल (दि.६) रात्री ला ८ वाजेच्या सुमारास घडली. अविनाश प्रल्हाद कुुंभरे(२३) असे मृतकाचे नाव आहे. आरोपी लहान भाऊ अक्षय प्रल्हाद कुंभरे (२१) हा सायंकाळी दारू ढोसून घरी आला. दरम्यान आई व मोठा भाऊ यांच्याशी त्याने भांडण सुरू केले. हे भांडण सोडविण्यासाठी मोठा भाऊ अविनाश मध्यस्ती
करण्यास गेला तसेच त्याला समजविण्याचा प्रयत्न करीत असतांना आरोपी अक्षयने मोठ्या भावाला मारहाण केली तसेच गळा दाबण्याचाही प्रयत्न केला.यावेळी दोघांमध्ये चांगलीच मारहाण झाली. दरम्यान आरोपीने घरात ठेवलेली सब्बल
काढून अविनाशच्या डोक्यावर मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.दारूमुळेच हा प्रकार घडल्याने पुन्हा कुटुंबियाचा संसार उघड्यावर आला आहे.फिर्यादीच्या तक्रारीवरून चिचगड पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ३०२ भादविन्वये गुन्हा नोंद केला असून आरोपीला अटक केली आहे.

blank