अवैध दारूसाठ्यासह वाहन ताब्यात

0
3824

चिचगड,दि.08 पोलिस ठाण्यांतर्गत वासनी शिवारात लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात जाणार्या वाहनासह पोलिसांनी दारूचा अवैध साठा ताब्यात घेऊन एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची घटना ६ सप्टेंबरची आहे.
आरोपींनी खाजगी वाहन क्र.सी.जी.०७/४८१६ किंमत ४ लाखमध्ये विदेशी दारूच्या २९ पेट्या किंमत २ लाख १७ हजार
५०० रुपये घेवून जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
रात्रगश्त वर कार्यरत असणार्या पोलिसांनी वासनी शिवारातून कोरचीकडे जाणाNया मार्गाची नाकाबंदी करून वाहनाची
तपासणी केली असता, पोलिसांना दारूचा अवैध साठा मिळवून आला. आरोपी राकेश गरिबा ठाकुर (३०) रा. भिलाई, भावेश सोनी (३०) रा. भिलाई या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोबाईल किंमत २५०० रुपये असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई सपोनि. अतुल तवाडे, पोउपनि.रोहित गांगुर्डे, पो.हवा.
कवलपालसिंग भाटिया, पोना.सुधाकर सहारे, पोसि. रवि जाधव,विष्णू राठोड आदींनी पार पाडली.