
गोरेगाव,दि.09: देवरी-आमगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सहषराम कोरोटे यांनी येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर काँग्रेस पक्षाचे गाव पातळीवरील संगठन मजबूत करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील तेढा येथे डॉ. विवेक मेंढे यांच्या निवासस्थानी बैठक घेत कार्यकर्ते व पदाधिकाèयांशी चर्चा केली. यावेळी चंद्रकुमार मेंढे यांच्या कुटुंबियांच्यावतीने आमदार कोरोटेंचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती पी.जी.कटरे, प्रदेश प्रतिनिधी राजेश नंदगवली, माजी जि.प. सदस्य रत्नदीप दहिवले, तालुका काँग्रेस अध्यष डेमेंद्र रहांगडाले आदि उपस्थित होते. सभेचे संचालन पुरुषोत्तम ब्राम्हणकार यांनी केले तर प्रस्तावना डॉ.विवेक मेंढे यांनी ठेवली. आभार माजी जि.प.सदस्य ज्योती वालदे यांनी मानले. कार्यक्रमाला तेढा ग्राम काँग्रेस अध्यक्ष सावलराम ताराम, मनोज वॉलदे, रमेश वाघमारे , टेकचंद संगोडकर, रूपंचद, हेमराज मेंढे, सुरेश मेंढे, तीर्थानंद नाईक, चंद्रकुमार बोलणे, संदीप राऊत, नरेंद्र शेंडे, रतीराम गावड, चंदू चुलपर, भाईलाल वरखंडे आदि उपस्थित होते.





