38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता लैगिक छळ प्रकरणातील चौकशीत प्राचार्य डॉ.भुस्कुटे दोषी-तक्रार निवारण समितीचा निर्वाळा

लैगिक छळ प्रकरणातील चौकशीत प्राचार्य डॉ.भुस्कुटे दोषी-तक्रार निवारण समितीचा निर्वाळा

0
841

blank

गोंदिया,दि.23ः- आमगाव तालुक्यातील भवभूती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.भुस्कुटे यांचे विरुध्द याच महाविद्यालयातील महिला ग्रंथपालाने कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम -२०१३ अंतर्गत केलेल्या जिल्हा महीला व बाल विकास तक्रार निवारण समितीकडील तक्रारीत समितीने प्राचार्य भुस्कुटेंना दोषी ठरवले असून विद्यापीठाला अहवाल पाठवून 60 दिवसाच्या आत अहवालाची अमलबजावणी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
उपरोक्त कायदयाचे कलम ११ नुसार समितीने दाखल तक्रारीची चौकशी केली असुन त्यानुसार प्राचार्य यांचेवरील आरोप सिध्द होत आहेत असा  निर्वाळा समितीने दिला आहे. समितीने निर्णय/ निकालांती सदर प्राचार्यावर विभागीय चौकशी करून शिस्तभंगांची कार्यवाही प्रस्तावित करावी. तसेच समितीने  तयार केलेला चौकशी अहवालातील दंडात्मक  शिफारशींची अंमलबजावणी करण्याकरीता सहसंचालक व कूलगूरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  नागपूर विद्यापीठ ,नागपूर  व संबंधित संस्था संचालक मंडळ यांना पाठविला आहे.सदर  कार्यवाही ६० दिवसांचे आत अंमलबजावणी करुन त्या बाबतचा अहवाल समितीस पाठवावा अशी विनंती सुद्धा समितीने विद्यापीठाच्या सहसंचालकांकडे केली आहे.

blank