36.8 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home गुन्हेवार्ता धोबिसराडच्या नाल्यात तिघे बुडाले,दोघे बचावले

धोबिसराडच्या नाल्यात तिघे बुडाले,दोघे बचावले

0
1046

गोंदिया,दि.२३: देवरी तालुक्यातील धोबिसराड नाला येथे  तीन मुलं बुडाल्याची घटना उघडकीस आले आहे.सविस्तर असे की गावातील पाच मुले गुरांसाठी चारा आणायला गेले होते, त्यापैकी तीन मुलं नाल्यातील पोहण्यााटी उतरले असता तिघे खोल पाण्य़ात गेल्याने बुडाले तरदोन मुलं सुखरूप बचावले. सदर घटना आज सकाळी घडली आहे.त्यामध्ये मृत मुलांची नावे सावन सिताराम पटले वय 22,अतुल माणिकचंद ठाकूर वय 16 व संदीप सोमराज कटरे वय 22 अशी आहेत.तर जी दोन मुलं सुखरूप बचावली त्यामध्ये आदित्य ओमप्रकाश गौतम वय 15 व राहुल नितराम पटले वय18 यांचा समावेश आहे.आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने या तिन्ही मुलांचे मृतदेह शोधून काढले आहेत.