दरोड्याच्या प्रयत्नातील चार आरोपी जेरबंद

0
507

गोंदिया,दि.26ः-गोंदिया ग्रामीण पोलिसांच्यावतीने विजयादशमीच्या निमित्ताने 25 आँक्टोंबरला शहरात प्रवेश करणार्या वाहनांवर नजर ठेवत रात्रीच्यावेळी गस्तीवर असतांना दरोड्याच्या बेतात असणार्या 4 संशयीतांना ताब्यात घेतले.तर 2 संशयीत आरोपी पळण्यात यशस्वी झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.सविस्तर असे की 25 आक्टोंबरच्या रात्री ग्रामीण पोलिसांच्यावतीने गस्त घालत असतांनाच बालाघाट टी पाॅंईटवरील बायपास रस्त्यावरील पुलाजवळ 6 संशयीत उभे राहून वाहनांवर नजर ठेवून असल्याची माहिती मिळाली.माहिती मिळताच पोलिसांची चमू घटनास्थळाकडे रवाना झाली.पोलिस वाहनाला बघताच दरोड्याच्या प्रयत्नाल असलेल्या 6 संशयीत आरोपीपैकी 2 आरोपी मोटारसायकलने फरार होण्यात यशस्वी ठरले,तर 4 संशयीतांना पोलिसांनी पकडले.त्यांच्याकडून 12 इंच लांब लोखंडी धारदार सळाख,लोखडांची टाॅमी,स्क्रू ड्राइवर, मिर्ची पैकेट सारखे साहित्य हमला करण्यासाठी आढळून आले.कागदपत्र नसलेली मोटारसायकलसह  71 हजार 215 रुपये किंमतीचा माल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला.पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून तपासणी केल्यावर समाधानकारक उत्तर संशयीत आरोपींनी दिले नाही.पोलिसांनी दरोडाच्या प्रयत्नासाठी उभे असल्याच्या कारणावरुन  फिर्यादि पोहवा/437 बालाजी कोकोडे यांच्या तक्रारीवरुन कलम 399, 402 भादवि, सह कलम महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124, सह कलम भारतीय हथियार कायदा कलम 4, 25 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सडमेक करीत आहेत.