पोलिसांनी १0 किलो विस्फोटक केली नष्ट

0
190
file photo

गडचिरोली=अहेरी तालुक्यातील तलवाडा -मिरकल मार्गावर नक्षल्यांनी लपवून ठेवलेला जवळपास १0 किलो विस्फोटक पोलिस जवानांनी जप्त करून घटनास्थळीच नष्ट केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. नक्षल्यांचा घातपाताचा डाव पोलिसांनी उधळला.
प्राप्त माहितीनुसार मिरकल जंगल परिसरात काल पोलिस जवाना नक्षलविरोधी अभियान राबवित होते. दरम्यान मिरकल-तलवाडा रस्त्यावर नक्षल्यांनी पोलिसांचा घातपात करण्याच्या उद्देशाने रस्त्यावर विस्फोटक लपवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिस जवानांना मिळाली. यावरून पोलिसांनी सतर्कता बाळगून सदर परिसरात अभियान तीव्र करून नक्षल्यांनी लपवून ठेवलेले जवळपास १0 किलो विस्फोट जप्त केला. याबाबतची माहिती गडचिरोली येथील बॉम्ब शोधक, नाशक पथकाला दिली. पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठून विस्फोटक तिथेच नष्ट केले. पोलिसांच्या सतर्कतेने मोठी घटना टळली. याबाबत पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी सांगितले तलवाडा-मिरकल मार्गावर नक्षल्यांनी पोलिसांचा घातपात करण्याच्या उद्देशाने लपूवन ठेवलेले विस्फोटक पोलिसांनी जप्त करून नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून लावण्यास पोलिसांना यश आले आहे. तसेच घटनास्थळावरून अन्य साहित्य आढळून आले. पोलिस विभागाच्यावतीने चौकशी सुरू असल्याचे सांगितले.