तिरोडा=स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची चाहुल लागताच जिल्ह्यात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे पक्षांतराची मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत तिरोडा तालुक्यात भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाली आहे. आ.विजय रहांगडाले यांच्या कार्यावर विश्वास ठेवून मनसे तालुकाध्यक्षासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर पंचायत, ग्राम पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या अनुषंगाने तिरोडा तालुक्यासह जिल्ह्यात राजकीय वारे वाहू लागले आहेत. त्यातच सर्व राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये पक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहेत. तिरोडाचे आमदार विजय रहांगडाले यांच्यावर विश्वास ठेवून मनसेच्या तालुका खुशाल राऊत यांच्यासह तुषार पटले, नितेश कटरे, राहुल वहिले आदिंनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान छोटेखानी कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, शहरध्यक्ष स्वानंद पारधी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रवींद्र वहिले, युवा मोर्चा शहरध्यक्ष अमोल तीतीरमारे, भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव टिनू टेम्भरे, भाजप ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष राजेश कावळे, माजी कृउबास सभापती वाय. टी. कटरे, माजी पं.स. उपसभापती बबलू बिसेन, सरपंच कमलेश आतीलकर, अनंता ठाकरे, महामंत्री जितेंद्र बिसेन, नंदकिशोर रहांगडाले आदी उपस्थित होते.