कार अपघातात दोन ठार 1 जखमी

0
334

यवतमाळ  : कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन ठार, तर एक जण जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पांढरकवडा रोडवरील खटेश्वर वळणावर घडली. या घटनेतील मृतांमध्ये प्रशांत दिगांबर मंडगवार (४५) रा.वाघापूर टेकडी यवतमाळ आणि नितीन गोविंद लांगर (३७) रा.वंजारीफैल यवतमाळ यांचा समावेश आहे. बहादुरे हे जखमी आहे. ते कार चालवत होते. एम.एच.२९/एबी-१५९८ या क्रमांकाच्या इंडिका कारने हे तिघे पांढरकवडा येथून यवतमाळसाठी निघाले होते. खटेश्वर गावाजवळ असलेल्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार निंबाच्या झाडावर आदळली. यात दोघे ठार झाले. जखमीला तात्काळ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.  या घटनेची माहिती जोडमोहाच्या पोलीस पाटील सूमन राजुरकर यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसांना दिली. ठाणेदार करेवाड, जोडमोहा बीटाचे जमादार गदई, संजय राठोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.