हत्तीराग अधिकारी कार्यालयातील सहायक अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात

0
269

 गडचिरोली=वैद्यकीय बिलासह मासिक वेतन व दिवाळीची अग्रीम रक्कम मंजूर करण्यासाठी एका कर्मचार्‍याकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज धानोरा येथील हत्तीराग अधिकारी कार्यालयात सहायक अधीक्षक (वर्ग३) प्रभाकर लांडगे (५६) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारकर्त्या कर्मचार्‍यांचे वैद्यकीय रजेचे बिल मंजुरीकरिता वरिष्ठ कार्यालयास सादर करावयाचे होते. तसेच त्याचे मासिक वेतन व दिवाळी अग्रीम रक्कमही मंजूर करावयाची होती. त्यासाठी सहायक अधीक्षक प्रभाकर लांडगे याने तक्रारकर्त्यास ५ हजार ५00 रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो ५ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाल. परंतु लाच देण्याची तक्रारकर्त्यांची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज या विभागाच्या अधिकार्‍यांनी धानोरा येथील हत्तीरोग अधिकारी कार्यालयात सापळा रचला. यावेळी तक्रारकर्त्यांकडून ५ हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रभाकर लांडगे यास पंचासमक्ष रंगेहाथ अटक केली.
सदर कारवाई पोलिस निरीक्षक यशवंत राऊत यांच्या नेतृत्वात हलवादाल प्रमोद ढोरे, शिपाई गणेश वासेकर, महेश कुकुडकर, किशोर ठाकूर, तुळशिराम नवघरे, घनश्याम वडेट्टीवार, सोनी तावाडे, सोनल आत्राम यांनी केली.