तेजस्वी यादव यांची मेहनत तरुणांसाठी प्रेरणादायी : शरद पवार

0
227

पुणे (प्रतिनिधी) : बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी केलेली मेहनत ही तरुण राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहे. बिहारमध्ये भाजप विरुद्ध तेजस्वी यादव अशी निवडणूक पाहायला मिळाली. आज जरी तिथे बदल झाला नसला तर भविष्यात तिथे बदलाची वाट निर्माण होत आहे. नितीश कुमार यांना मोठा फटका बसला आहे, असं म्हणता येणार नाही. भाजपच्या जागा वाढल्या असल्या तरी नितीश कुमारांचंही फार काही नुकसान झालेलं नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

तेजस्वीला जेवढी मोकळीक मिळेल तेवढा फायदा होईल, असा अंदाज होता. म्हणून आम्ही बिहार निवडणुकीत सहभाग घेतला नाही, असंही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.