गोंदिया,दि.11-गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही वर्षापुर्वी नक्षल चळवळीत सक्रीय राहिलेल्या परंतु त्यानंतर चळवळ सोडून १० वर्षापासून फरार राहून सुकमा जिल्ह्यातील
एका गावात जिवनव्यतीत करीत असलेल्या देवरी दलमच्या कमांडरला गोंदिया पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर ताब्यात घेतल्याची माहिती गोंदियाचे अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालदंर नालकुल यांनी पत्रकार परिषदेत दिली.सदर नक्षलीचे नाव रमेश उर्फ हिडमा मडावी असे आहे.१९९८-१९९९ मध्ये नक्षल मध्ये भरती झालेला होता़़त्याच्यावर १३ गुन्हे दाखल आहेत न्यायालयात हजर करून पाच दिवसाचा पीसीआर मिळालेला आहे. पोलीस उपनिरिक्षक अभयसिंह शिंदे सह सी ६० च्या देवरी पथकाने छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे जाऊन १० नोव्हेबंरला ताब्यात घेतले.याच्यावर १२ लाखाचे पुरस्कार होते.