माजी आमदाराच्या पुत्राची डॉक्टरला मारहाण

0
82

आरमोरी-स्थानिक कोविड सेंटरवर कार्यरत असलेल्या डॉ. मारबते यांना माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या पुत्राने कोविड केअर सेंटरवर मारहाण केल्याने लारेन्स आनंदराव गेडाम यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार उपजिल्हा रुग्णालय आरमोरी अंतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय निवासस्थान कोर्टाच्या मागे असलेले या ठिकाणी कार्यरत असलेले कोविड केअर सेंटरमध्ये नोडल ऑफिसर म्हणून शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत मारबते यांचे सहकार्‍यासह कोविड रुग्णांची तपासणी व औषधी देण्याचे काम करीत असताना १२ मे रोजी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास लारेन्स आनंदराव गेडाम (२0) रा. आरमोरी यांनी रुग्णास औषधी देण्याचे कारणावरून डॉ. अभिजीत मारबते यांच्याशी वाद घालून त्यांना ईल शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून जाऊन हाताने चेहर्‍यावर कानावर थापड मारली. डॉ. मारबते हे शासकीय काम करीत असताना त्यांच्यावर हल्ला करून शासकीय कामापासून परावृत्त केल्याने डॉ. अभिजित मारबते यांनी आरमोरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी लारेंस आनंदराव गेडाम यांच्याविरुद्ध १४७ /२0२१ भांदवि कलम ३५३,३३२, २९४, ५0४ सह महाराष्ट्र मेडिकेअर पर्सन्स व मेडिकेअर इन्स्टिट्यूशनस प्रीवेंसंन ऑफ व्हायलेसेस, लॉस डॅमेज टू प्रापर्टी अँक्ट २0१९ चे कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी लारेन्स गेडाम यास ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज बोडसे करीत आहे.