ट्रेनच्या धडकेत रेल्वे कर्मचारी ठार

0
96

तुमसर/तिरोडा, दि.21 : रेल्वेच्या मुंडीकोटा-तुमसर अपलाइन दरम्यान कर्तव्यावर असलेल्या एका रेल्वे कर्मचार्‍याचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी, रात्री 10.40 वाजता मुंडीकोटा-तुमसर अप लाइन दरम्यान घडला. धनराज निवरे (वय 25) असे त्या मृतक रेल्वे कर्मचार्‍याचे नाव आहे.

वृत्त असे की, मृतक धनराज निवरे हा तुमसर रेल्वेच्या OHE डेपो मध्ये मदतनीस म्हणून कार्यरत होता. एमएनयू-टीएमआर यूपी लाइन दरम्यान मेगा ब्लॉकच्या सीएनएसटी कामासाठी अर्थ रॉड प्रदान करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री आपली ड्यूटी बजावत असताना (एनजीपी-डीआयव्ही) ट्रेन क्रमांक 02812 THE-LTT ची मुंडिकोटा-तुमसर अप लाइन दरम्यान (KM- 1048/1 येथे) रात्री 10.40 वाजता त्यांना धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी मार्ग दाखल केला आहे. मृतक रेल्वे कर्मचारी मूळचा बालाघाट जिल्ह्याचा रहिवाशी असल्याचे संगितले जात आहे. पुढील तपास सुरू आहे.