संकटकाळात कोरोना योद्ध्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय- आमदार विनोद अग्रवाल

0
86

गोंदिया,दि.21ः-कोरोना विषाणूमुळे गेल्या वर्षभरापासून संपूर्ण भारतात हाहाकार सुरु आहे.आशा सेविका, अंगणवाडी सेविका, डॉक्टर, अटेंडंट यांनी कोरोना वॉरियर्स म्हणून कोरोनाच्या या लढाईत महत्वाची भूमिका बजावली.कोरोनाच्या  संकटाच्या काळातही त्यानी स्वतःच्या आणि कुटुंबाची काळजी घेत या लढाईत या सहभागी होत सेवा दिली आहे.आजही कोरोनाचा धोका कमी झालेला नाही,त्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.कोरोनाच्या या संकटात ज्यांनी गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त करण्याचे कर्तव्य जिवाची पर्वा न करता,देशासाठी योद्धा बनून केली त्यांचे हे कार्य अविस्मरणीय असल्याचे विचार आमदार विनोद अग्रवाल यांनी कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. संबोधित केले. कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.वेदप्रकाश चौरादडे,खंड विकास अधिकारी दिलीप खोटेले, तहसीलदार आदेश डफळ, अप्पर तहसीलदार अनिल खड़तकर,चैताली नागपुरे,मुनेश रहांगडाले आदी उपस्थित होते.