विहिरीत पडून दोन युवकांचा मृत्यू;घटेगाव येथील घटना

0
66

विहिरीत गॅस असल्याची चर्चा
सडक अर्जुनी —गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील घटेगाव येथील हिरालाल कोसलकर यांचे खाजगी विहिरीत पडून दोन यूवकांचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवार 21 आँगस्टला दुपारी 1.30 वाजता दरम्यान घडली.मृतकाचे नाव कृर्मराज हिरालाल कोसालकर( वय 31) व संघपाल दुर्योधन पंचभाई (वय 32ः) राहणार घटेगाव यांचा समावेश आहे.
सविस्तर वृत असे की , कृर्मराज हा अापल्या घराच्या विहीरीमधील मेलेले बेडूक काढण्यासाठी गेले असतां, तोल न सांभाळल्याने विहिरीत पडला.त्याला काढण्यासाठी घरा शेजारी असलेला संघपाल पचभाई हा विहिरीत उतरला असता, दोघेही विहिरीचे वर आले नाही.त्यामुळे पाहणाऱ्या लोकांनी आरडाओरड केली असता कुणीही विहिरीत उतरण्यासाठी तयार झाले नाही.त्यानंतर सदर घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना दिली असता पोलीस निरीक्षक सचिन वांगडे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. गावकरी व पोलिसांच्या मदतीने त्या दोन्हीं मृतकाना बाहेर काढण्यात आले.मृतदेह उत्तरीय तपासणी करीता सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.