42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता अर्जुनी मोरगाव पोलिसांची अवैध दारू धंद्यावर कारवाई

अर्जुनी मोरगाव पोलिसांची अवैध दारू धंद्यावर कारवाई

0
44

blank

अर्जुनी-मोरगाव : पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या नेतृत्वात तालुक्यातील अवैध धंद्याविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेत दोन अवैध दारू विक्रेत्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई रविवार, 29 ऑगस्ट रोजी करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील सतीश शिवदास खोब्रागडे (वय 33) रा.गांधीनगर ता. देसाईगंज वडसा आणि तालुक्यातील राजकुमार केवळराम रामटेके (वय 43) रा.चान्ना बाकटी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांचे तालुक्यातील सट्टापट्टी, जुगार आणि अवैध दारू विक्रेते यांची गुप्त माहिती काढून धाड मारणे सुरू आहे. गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पाळतीवर  असताना दुचाकीने दारू वाहतूक करताना आरोपीस अटक करण्यात आली. (एम.एच.33 एस.2647) क्रमांकाच्या स्प्लेंडर प्लस या दुचाकीने आरोपी सतीश शिवदास खोब्रागडे हा अवैध दारू वाहतूक करताना आढळला. आरोपीकडून 90 मिलिने भरलेले 100 बाटल्या (किंमत 3500 रुपये) आणि 40 हजारांची दुचाकी असा 43 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

blank