राधाकृष्ण मंदिराच्या दानपेटीतून रक्कम लंपास

0
27

गोंदिया : जिल्ह्यात चोर्‍या व घरफोड्या सातत्याने घडत आहेत. मात्र आता चोरांनी मंदिरांना सुद्धा आपले लक्ष्य बनविले आहे. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या आशीर्वाद कॉलनीमध्ये असलेल्या राधाकृष्ण मंदिरात घुसून चोरांनी दानपेटीमधील रक्कम लंपास केली. ही चोरी 13 सप्टेंबरच्या रात्री 10.30 ते 14 सप्टेंबरच्या सकाळदरम्यान घडली.

सदर रात्रीदरम्यान अज्ञात चोरांनी आशीर्वाद कॉलनी येथील राधाकृष्ण मंदिराला लागलेली कुंदी कापून आत प्रवेश केला. तेथे मूर्तिजवळ ठेवलेल्या दानपेटीमध्ये जवळपास 5 हजार रुपये जमा झाले होते. चोरांनी सदर रक्कम लंपास केली.फिर्यादी जयदेव चेतन तोलानी (वय 50) रा. आशीर्वाद कॉलनी, फुलचुरटोला गोंदिया यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम 380, 454, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.