36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता ट्रॅक्टर व कारमध्ये अपघात: एकाचा मृत्यू तर एक गंभीर

ट्रॅक्टर व कारमध्ये अपघात: एकाचा मृत्यू तर एक गंभीर

0
182

blank

ब्रह्मपुरी– आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील रणमोचन-जुगनाळा फाट्या लगत ट्रॅक्टर व क्रेस्टा कारमध्ये धडक झाल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये चामोर्शी येथील आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर अतुल गण्यारपवार हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना ब्रह्मपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सदर घटना दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली.
सदर ट्रॅक्टर हा जुगनाळा गावावरून रणमोचन गावाकडे जात असतांना चामोर्शी वरून अतुल गण्यारपवार व आनंद गण्यारपवार व अन्य दोन व्यक्ती एमएच ३३व्ही. २४५ क्रेस्टा कारने नागपूरला काही खाजगी कामानिमित्त जात असतांना आरमोरी ब्रह्मपुरी रोडवरील रनमोचन फाट्या लगत ट्रॅक्टरनी कारला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यात चामोर्शी येथील भाजपचे जिल्हा सचिव आनंद गण्यापवार हे जागीच ठार झाले. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना ब्रह्मपुरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या कारला एअर बॅग असल्यामुळे ते बचावल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हा अपघात इतका भीषण घडला की यामध्ये ट्रॅक्टरचे इंजिनचे दोन तुकडे झाले आहेत. अधिक तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत.

blank