अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या तरुणीच्या चेहरा एसीडने जाळला

0
171

आमगाव,दि.21-  तालुक्यातर्गत येणाऱ्या कुंभारटोली जंगल परिसरात एका अंदाजे 17 ते 21 वर्षीय तरुणीवर अत्याचार करीत एडिस टाकून हत्या करीत मृतदेह जंगल परिसरात फेकून दिल्याची घटना आज (दि.21)सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आज सकाळी कुंभारटोली गावातील काही लोक जंगल परिसरातील महादेव पहाडी भागाकडे सरपण वेचण्याकरीता व मार्निंगवाँकला गेले असताना गावकर्यांना मुलीचे मृतदेह दिसताच आमगाव पोलिसांना माहिती दिली. आमगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक दिलीप कन्नमवार यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेत  उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णायात पाठविले.तरुणीचा चेहरा पुर्णतःजळाल्याने ओळख पटू शकली नाही.तिच्या कानाजवळ जखमा सुध्दा असल्याचे बोलले जात आहे. त्यातच त्याठिकाणी ओळख पटविण्यासाठीचे कुठलेही साहित्य घटनास्थळावर न मिळाल्याने पोलिसांसमोर ओळख पटविण्याचे आवाहन निर्माण झाले आहे. हि घटना काल रात्री घडली असून काही अज्ञात इसमांनी सदर तरुणीवर आत्याचार करीत तोंडावर एडिस फेकून पळ काढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.आमगाव पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले असून श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले आहे. ही तरुणी कुठली आहे. तिची हत्या का करण्यात आली, हे सर्व प्रश्न सध्यातरी निर्माण झाले आहेत.