साखरपुड्यास जाताना कुटुंबाच्या वाहनास झाला अपघात; १ ठार, ६ जखमी

0
45

रत्नागिरी : साखरपुड्यासाठी जात असताना एका कुटुंबाच्या चार चाकीचा दापोली खेड महामार्गावर  कुंभवे नजीक अपघात झाला. या अपघातात  एक जण ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. हा अपघात झाल्याची माहिती समजताच पाेलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना जखमींवर प्राथमिक उपचार केले हाेते. यावेळी वाहनाचे माेठे नुकसान झाल्याचे पाेलीसांच्या निदर्शनास आले.घटनास्थळावरुन मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार दापोली कुंभवे येथून मंडणगड येथे साखरपुड्याकरीता चार चाकीमधील लाेक निघाले हाेते. या अपघातात एक जण ठार झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. या जखमींवर दापाेली (dapoli) येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.