गाडगेबाबांचे स्मरण करून अंधश्रद्धेचा नायनाट करा-संजय गणवीर

0
60

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

अर्जुनी /मोर ता.22:-वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून स्वच्छता, सामाजिक सुधारणा आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रबोधन केलं,ते विज्ञानवादी थोर संत होते, त्यांच्या विचारांचे स्मरण करून अंधश्रद्धेचा नायनाट करा असे आवाहन गोंदिया ज़िल्हा परिषदेचे (महिला व बालकल्याण) उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष संजय गणवीर (ता.21) यांनी केले. त्यांनी तालुक्यातील पवनी /धाबे गावाची पाहणी करून त्या दरम्यान आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मंचावर समितीचे सचिव राजेश उखळकर, सरपंच श्रीमती पपीता नंदेश्वर, उपसरपंच पराग कापगते, उमेंद्र भगत, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती वैद्य, श्रीमती पटले, आणि साजन बाहुरिया उपस्थित होते.
श्री गणवीर पुढे म्हणाले की, गाडगेबाबांचा जन्म दीडशे वर्षापूर्वी झाला असला तरी आजही त्यांचे विचार प्रासंगिक आहेत. महाराष्ट्र शासन हे लोकसहभागातून गाडगेबाबांच्या नावाने हे अभियान गेल्या 21 वर्षांपासून राबवित असून त्यांनी शासनाची जोरदार प्रशंसा केली.गोंदिया जिल्हापरिषदेच्या गोठणगाव गटातून हे गांव प्रथम आल्यामुळे या गावाची पाहणी करण्यात आली.
पवनी /धाबे येथे समितीचे आगमन होताच त्यांनी जननायक बिरसा मुंडा, तथागत बुद्ध आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याना माल्यार्पण केलं.मोठ्या संख्येने उपस्थित गावकरी आणि त्यांच्या भजन मंडळानी सादर केलेल्या संगीतमय भजणांच्या तालासुरात गावातून फेरी काढण्यात येऊन गावाची पाहणी करण्यात आली.
समितीच्या चमुने विचारलेल्या प्रश्नांची मुद्देनिहाय उत्तरे देण्यात आली.संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थिनींनी बहारदार स्वागतगीत सादर केले. आदिवासी वेशभूसा धारण करून स्वागतासाठी तत्पर असणाऱ्या त्या मुलीच्या कार्याचे कौतुक करण्यात आलं.या जिल्हास्तरीय समितीने तालुक्यातील बुधेवाडा,निमगाव,केशोरी, जानवा, कवठा, सोमलपूर याही गावांची तपासणी केली.
समितीच्या चमुचे स्वागत सरपंच श्रीमती पपीता नंदेश्वर, उपसरपंच पराग कापगते, सदस्य सौ जोशीला पंधरे, टिकाराम दर्रो, सौ सुनंदा कवडो, कैलाश पंधरे, सौ सुशी मडावी आणि सौ दीपिका चुटे, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्यामराव नंदेश्वर, गणिराम कापगते, कुसन इसकापे, मुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सरपंच श्रीमती नंदेश्वर यांनी,संचालन ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर यांनी तर आभार उपसरपंच कापगते यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सुनील नेवारे,तूलसीदास राऊत,गोपाल पुराम, देवकुमार हटवार,सतीश साखरे, तुलाराम वाढई, जीवन कुंभरे,आणि गावातील सर्वच नागरिकांनी अथक परिश्रम केले.