पोलिस शिपायाची गोळी झाडून आत्महत्या,अज्ञात वाहनाच्या धडकेत मुख्याध्यापक ठार

0
75

अहेरी- माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाड्यात नैनात असलेल्या पोलिस शिपायाने स्वत:वर गोळू झाडून आत्महत्या केल्याची घटना सोमवार, २५ एप्रिल रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास घडली. नीतेश अशोक भैसारे (वय ३६) असे मृत शिपायाचे नाव आहे.
नीतेश भैसारे अहेरी येथील प्राणहिता पोलिस मुख्यालयात कार्यरत होता. आज माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी नीतेशची ड्युटी लावण्यात आली होती. डयुटीवर येतात त्याने आपल्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडली. यात घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. नीतेश भैसारे हा मुळ चंद्रपूर येथील रहिवासी असून, पत्नी, मुलगा व मुलीसह तो अहेरी येथे वास्तव्य करीत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पोलिस घटनेचा तपास करीत असल्याची पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी सांगितले.

अज्ञात वाहनाच्या धडकेत मुख्याध्यापक ठार, शिक्षक जखमी

अहेरी-अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने खासगी आर्शमशाळेचा मुख्याध्यापक ठार, तर शिक्षक जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी आलापल्ली-भामरागड मार्गावरील मिरकल फाट्यावर घडली. किशोर मद्देर्लावार (वय ५३) असे मृत मुख्याध्यापकाचे, तर रमेश गौरकर (वय ५0) असे जखमी शिक्षकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, किशोर मद्देर्लावार व रमेश गौरकर हे माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या राजे धर्मराव शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित मन्नेराजाराम येथील राजे धर्मराव आर्शमशाळेत कार्यरत होते. शाळेचे ऑडिट असल्याने दोघेही मोटारसायकलने मन्नेराजाराम गावाकडे जात होते. दरम्यान मिरकल फाट्यावर पोहचताच समोरुन येणार्‍या अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मुख्याध्यापक किशोर मद्देर्लावार हे जागीच ठार झाले, तर रमेश गौरकर जखमी झाले. गौरकर यांच्यावर अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत किशोर मद्देर्लावार यांची पत्नी जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे.