महसूल विभागातील महिला कारकून एसीबीच्या जाळ्यात

0
230

आमगाव,दि.26-कुटुंबातील वडीलोपार्जित जमिनीवरील हक्क सोडून सदर जागेवरून बहिणीेचे नाव कमी करण्यासाठी आमगाव तहसील कार्यालयातील अव्वल कारकूनाने तक्रारदारास आठ हजार रूपयाची मागणी केली. या संबंधी लाचलुचपत विभागाने कार्यवाही करून त्या कारकून महिलेला रंगेहाथ अटक केली, परिणामी, महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील आरोपी छाया वासुदेव रहांगडाले (वय 43) राहणार बनगाव हिला लाचलुचपत विभागाने अटक करून गुन्ह्याची नोंद केली आहे.

 हकीकत अशी की, सावंगी येथे तक्रारदार शेतकरी यांची त्यांचे आईचे नावे वडिलोपार्जित शेती आहे. आईच्या मृत्यू नंतर सर्व वारसानांची नावे रेकार्डवर आली. या जमिनीवरून तक्रारदाराच्या बहिणींने आपले हक्क कमी करण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करून सदर जमिनीवर फेरफार घेण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज सादर केला. मात्र, तीन महिने उलटून ही कोणतीही नोटीस न निघाल्याने तक्रारदाराने तहसील कार्यालय गाठून या विषयी प्रशासनाकडे विचारणा केली. यावेळी संबंधित प्रकरणाशी संबंधित असलेल्या अव्वल कारकून यांनी तक्रारदारास आठ हजार रुपयांची मागणी केली.

याविषयीची तक्रार संबंधित शेतकऱ्याने गोंदियाच्या लाचलुचपत विभागाकडे केली. त्यावरून या प्रकरणाची शहानिशा करून आरोपी विरुद्ध सापळा कार्यवाही आज दि. 26 रोजी करण्यात आली. यावेळी आरोपीने सहा हजाराची लाच स्विकारल्यावरून तिचे विरुद्ध आमगाव पोलिसांक गुन्ह्याची नोंद करून आरोपीला अटक करण्यात आली. सदर कार्यवाही ही पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गीते यांचे मार्ददर्शात पोलिस उपअधीक्षक पुरषोत्तम अहेकर, पोलिस निरीक्षक अतुल तवाडे,विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे,मिलकीराम पटले,  राजेंद्र बिसेन, संतोष शेंडे, मंगेश कहालकर,संतोष बोपचे, संगीता पटले, रोहिनी डांगे, दीपक बाटबर्वे यांनी केली.