एटीएममधून पैसे काढणारा आरोपी गजाआड

0
35

अर्जुनी मोर- स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएममध्ये गेलेल्या फिर्यादीची दिशाभूल करून एटीएम कार्ड अदलाबदल करून खात्यातून ३७ हजार रुपये ७ एप्रिल रोजी काढण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी पितांबर लाडेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेत पोलिसांनी शोधचक्र फिरवून आरोपीला गजाआड करण्यात यश मिळविले. सत्यपाल नामदेव नाकतोडे रा. वडसा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की, फिर्यादी पितांबळ लाडे हा स्थानिक बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएममध्ये गेला होता. दरम्यान एका अनोळखी इसमाने त्त्याला पैसे काढण्यास मदत केली. त्यातच त्याची दिशाभूल करीत एटीएमची अदलाबदल केले. फिर्यादी घरी गेल्यावर ३७ हजार रुपये काढण्याचे संदेश मोबाईल वर आले. यावर त्याने एटीएम कार्ड पाहिले असता, ते एटीएम कार्ड दुसर्‍याचे आढळले. यामुळे त्या इसमाने फसवणूक केल्याची बाब समोर आली.
यावरून अजुर्नी मोरगाव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचे गांभिर्य लक्ष्यात घेत पोलिसांनी शोधचक्र फिरविले. दरम्यान, भौतिक पुरावे, तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपी सत्यपाल नामदेव नाकतोडे याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, फिर्यादीची दिशाभूल करून एटीएमच्या माध्यमातून पैसे काढण्याचे त्याने कबुली दिली. हे यशस्वी तपास कार्य पोलिस अधीक्षक पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, पोलिस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सपोनि. संभाजी तागड, सपोनि. सोमनाथ कदम, प्रवीण बेहरे, रमेश सेलोकर, श्रीकांत मेर्शाम, मोहन कुहीकर, गौरीशंकर कोरे यांनी केले.