Home गुन्हेवार्ता बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यात ईसमाचे प्रेत मृतावस्थेत आढळले

बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यात ईसमाचे प्रेत मृतावस्थेत आढळले

0

*>>खापा-काटेबाम्हणी शेतशिवारातील बावनथडी कालव्यातील घटना.*

विपुल परिहार
तुमसर :::तालुक्यातील खापा -काटेबाम्हणी शेतशिवारातील बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यातील वाहत्या पाण्यात एका ईसमाचे मृताअवस्थेत प्रेत आढळुन आल्याची घटना ३०
एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान उघडकीस आली.

रमेश मुलचंद धांडे (४८) रा. ताडगाव ता. मोहाडी असे बावनथडीच्या कालव्यात प्रेत आढळुन आलेल्या ईसमाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की मोहाडी तालुक्यातील ताडगाव येथिल अल्पभूधारक शेतकरी रमेश धांडे हे मागिल काही दिवसांपासून एका गंभिर आजाराने ग्रस्त होते. आजाराने ग्रस्त असलेले रमेश धांडे हे तुमसर येथिल सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात प्रकृती बरी नसल्यामुळे उपचार्थ भरती होते.परंतु उपचारादरम्यान प्रकृती बरी वाटत असल्याने रमेश यांनी रूग्णालयातुन सुट्टी न घेता रूग्णालयाच्या बाहेर पडले. दरम्यान रमेश रूग्णालयात व घरी आले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी घटनेच्या सकाळ पासून रमेश धांडे यांची शोधाशोध सुरू केली असता ते आढळुन आले नाही. दरम्यान ३० एप्रिल रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास खापा-मांगली काटेबाम्हणी शेतशिवारातील बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यातील वाहत्या पाण्यात रमेश धांडे यांचे प्रेत खापा येथिल नागरिकांना आढळून आले. सदर घटनेची माहिती होताच घटनास्थळी नागरीकानी एकच गर्दी केली होती. मृतक रमेश धांडे हे गेल्या कित्येक दिवसांपासून एका गंभिर आजाराने ग्रस्त होते व त्यांना दारूचे व्यसन जडले होते अशी माहीती सांगीतली जात आहे. येथे रमेशने आजाराला कंटाळून आत्महत्या केली .? की हत्या .?
असा संशय येथे व्यक्त केला जात आहे. परंतु मृतक रमेश धांडे हे तुमसर उपजिल्हा रुग्णालयातुन सुट्टी न घेता हाताला सलाईनची स्ट्रिप लावुन रूग्णालयाच्या बाहेर पडले कसे .? त्यावेळी त्याच्या सोबत त्यांचे नातेवाईक अथवा रूणालायातील डाँक्टर अथवा परिचारीका हजर नव्हत्या का.? रुग्णालयात डाँक्टर, परिचारीका, नातेवाईक हजर असतील तर मृतक रमेश धांडे रूणालयाच्या बाहेर सुट्टी न घेता बाहेर पडले कसे.? असे अनेक प्रश्न येथे उपस्थित होत आहे.

मृतक रमेश धांडे यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, दोन मुली,असा आप्त परिवार आहे. सदर घटनेची माहिती होताच घटनास्थळी तुमसर पोलिस दाखल होत घटनस्थळाचा पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनाकरीता तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.सदर घटनेचा पुढील तपास तुमसर पोलिस करीत आहे.

Exit mobile version