Home गुन्हेवार्ता गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री करणाऱ्या ॲमेझॉन विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री करणाऱ्या ॲमेझॉन विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

0

मुंबई, दि. २ : इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पोर्टलवर गर्भपातासाठी वापरात येणारी औषधे नियमबाह्य पद्धतीने विक्री होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. याऑनलाईन विक्रीची पडताळणी करण्यासाठी विविध ऑनलाईन विक्री पोर्टल्स वर विनाप्रिस्क्रीप्शन MTP kit या औषधाची मागणी नोंदविण्यात आली होती.

ॲमेझॉन (amazon.in ) या ऑनलाईन पोर्टल वर A-Kare या ब्रँड नावाने गर्भपाताचे औषध उपलब्ध असल्याचे आढळून आले होते. या औषधाची मागणी amazon.in द्वारे डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन ची मागणी न करता स्वीकारली गेली व हे औषध कुरियरने प्राप्त झाले. या कुरियर पार्सलसोबत  औषध विक्रीचे बिल प्राप्त झाले नाही.

या औषधाच्या विक्री प्रकरणात प्रशासनाने  ॲमेझॉन सेलर्स सर्विसेस ला माहिती विचारणा केली असता या औषधे ओरिसा येथून पुरवठा करण्यात आल्याचे कळविण्यात आले. ॲमेझॉनने पुरविलेल्या माहितीच्या  आधारे पुढील तपासात ओरिसा येथील विक्रेत्याने सदर औषध पुरविले नसून त्याचे औषध विक्री दुकानाचे कागदपत्रे वापरून सदर औषध विक्रीसाठी इतर  व्यक्तीने ॲमेझॉनच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केली असल्याचे आढळून आले.

MTP kit हे औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० व नियमांतर्गत अनुसूची H प्रवर्गातील औषध असून त्याची विक्री केवळ पंजीकृत वैद्यकीय व्यवसायिकाच्या प्रिस्क्रीप्शन वरच करणे बंधानकारक आहे. तसेच वैद्यकीय गर्भपात कायदा, २००२ व नियम, २००३ नुसार सदर औषधाचा वापर अधिकृत आरोग्य सुविधा असलेल्या ठिकाणी व सेवा पुरविणाऱ्याच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात येणे बंधनकारक आहे.

amazon.in या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून विक्री करण्यात येणाऱ्या वस्तूच्या यादीत औषधे घटक अंतर्भूत नाही.  या प्रकरणात ॲमेझॉनने  त्यांच्या  माध्यमातून औषधे  विक्री करण्यास नोंदणी करणाऱ्या संस्था/व्यक्ती यांची शहानिशा केली नाही. amazon.in या ऑनलाईन पोर्टल वर सदर विक्रेत्याने MTP kit या गर्भपातासाठी वापरत येणाऱ्या  औषध प्रकारचे नाव न देता ब्रांड नावाने (A-Kare tablets) विक्रीसाठी नोंदणी केली. औषधांच्या  विक्रीसाठी  प्रचलित  कायदे व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे या बाबत खात्री ॲमेझॉनद्वारे करण्यात आली नाही. डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय ज्या औषधांची विक्री करणे रुग्णाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे अश्या गर्भपाताच्या औषधाची   सर्रास विना प्रिस्क्रीप्शन विक्री ॲमेझॉनद्वारे केल्या गेली आहे.

वरील प्रकरणी A-Care या ब्रांड नावाने गर्भपाताच्या औषधाची विक्री संबंधित विक्रेत्याने व amazon.in  यांनी संगनमताने करून भारतीय दंड  संहिता,१८६०  औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० व नियम, १९४५ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अंतर्गत Intermediaries साठी असणाऱ्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आले.  त्यामुळे amazon.in या ऑनलाईन विक्री पोर्टल व संबंधित विक्रेत्याविरुद्ध  खेरवाडी पोलीस स्टेशन बांद्रा (पूर्व) येथे  भारतीय दंड संहिता ,१८६० व माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० सहवाचन औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०  च्या विविध कलमाखाली दि. २९/०४/२०२२ रोजी औषध निरीक्षक (गुप्तवार्ता )मुख्यालय द्वारे गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांद्वारे करण्यात येत आहे.

0000

विसअ/अर्चना शंभरकर/प्रेस नोट/ अ व औ.प्र.

 

FDA, Maharashtra registered FIR against amazon.in

for the online sale of abortion drug -MTP Kit.

 

Mumbai Dt. 2; The Food and Drugs Administration had observed that abortion drugs were being sold illegally on online portals through the internet. In order to verify this, the demand for MTP kit without prescription was registered on online sales portals.

It was found that the abortion medicine under the brand name A-Kare was available on the online portal amazon.in. The demand for the MTP kit drug was accepted by the amazon.in without the requisite prescription of the registered medical Practitioner. The MTP Kit by the brand name of ‘A kare’ Tablet was received; however the sale bill of the drug was not received along with the courier parcel.

This administration inquired about the sale of above MTP drug to Amazon Sellers Services Pvt Ltd, it was informed that the drug was supplied from Orissa. Further investigation based on the information provided by Amazon revealed that the drug was not supplied by the seller in Orissa but the seller ID was registered by another person on Amazon’s online portal   using the documents of said drug store.

The MTP kit is a ‘Schedule H’ drug under the Drugs & Cosmetics Act, 1940 and it is mandatory to sell it only on the prescription of a registered medical practitioner. Also, according to the Medical Termination of Pregnancy Act, 2002 and Rules, 2003, it is mandatory to use this medicine at health facility and under the supervision of a service provider.

The list of items sold through the online portal amazon.in does not include the commodity drugs. In this case, Amazon did not observe the due diligence to verify the firm/ individuals who were registered to sell drugs through their platform.  On the online portal amazon.in, the seller registered the MTP kit for sale under the brand name (A-Kare tablets) without naming the generic name of the drug. Amazon.in has not ensured the compliance of the laws time being in force for the sale of drugs. The drugs like MTP kit which are not to be sold without the prescription of the Doctor as it may endanger the health and life of the patient. However Amazon found to be promoted the sale of abortion drugs without prescription.

In above case, the online sale of abortion drugs under the brand name A-Care was done in connivance by the seller and amazon.in and found to be violated the provisions of   various laws time being in force.

Therefore, FIR under various sections of Indian Penal Code, 1860 and Information and Technology Act, 2000, read with relevant Section of Drugs and Cosmetic Act and rules was registered against the online sales portal amazon.in and others at Kherwadi Police Station, Bandra (East) on 29/04/2022 by the officer of Intelligence Branch (drugs), FDA HQ. Further investigation is being conducted by the police.

error: Content is protected !!
Exit mobile version