मामा-भाचा डोहाने घेतला युवकाचा बळी

0
63

अकोला,दि.05ः- आतापर्यंतर्यं शेकशे जीव घेणार्‍या हिवरखेड नजीकच्या वारी हनुमान येथील येथील कुख्यात मामा भाचा डोहाने आज पुन्हा एक बळी घेतला आहे.त्यामुळे मागील अनेक वर्षापासून डोह बुजविण्याची होत असलेली मागणी प्रशासनाने पूर्ण करण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.
अकोला येथील 22 वर्षीय युवक राज सुनील गुडधे हा आपले दोन मित्र मोहित सुनील नागदेव आणि ऋषभ संजय सोनोने यांचेसह मोटारसायकलने वारी हनुमान येथे दर्शनाला आला होता. त्यापैकी ऋषभ संजय सोनवणे हा दर्शनासाठी मंदिरात गेला आणि राज गुडघे व मोहित नागदेव यांना आंघोळीचा मोह आवरला नसल्याने ते मामा भाचा डोहात आंघोळीसाठी गेले. मामा भाचा डोहात आंघोळ करीत असताना राज गुडधे याचा पाय घसरून खोल पाण्यात बुडून मरण पावला. घटनेची माहिती मिळताच वारीचे सरपंच शिवाजी पतींगे घटनास्थळी पोहोचले व पोलिसांना माहिती दिली.
बुडालेल्या युवयुकासोबत आलेले मित्र मोहित सुनील नागदेव यांनी हिवरखेड पोलिसात फिर्याद दिली. हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी प्रेताला बाहेर काढले, पंचनामा केला,आणि प्रेत शवविच्छेदनासाठी तेल्हाराकडे रवाना केले.हिवरखेड पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गोपाल दातीर विनोद इंगळे इत्यादी करीत आहेत.