मुंडीपार येथे नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिरचे आयोजन

0
32

गोरेगांव:-ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार येथे सहयोग रुग्णालय गोंदिया यांच्या वतीने नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी व ईसीजी यांचा समावेश होता.
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन सहयोग फाउंडेशन द्वारा जिल्ह्यातील गावोगावी तज्ञ डॉक्टरांची चमू द्वारे पोहोचत असून खेड्यापाड्यात शिबिर आयोजित करण्यात येत आहेत अनेकांना गंभीर आजाराची लक्षणे दिसत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात येण्याचा सल्ला देण्यात आला.रुग्णांनी मोठ्या संख्येने तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता डॉ.सिद्धार्थ कामळे,डॉ. मंथन हरिणखेळे,सरपंच सुमेंद्र धमगाये,, उपसरपंच जावेद (राजाभाई)खान, सचिव अरविंद साखरे, ग्रा.पं.सदस्य चंद्रगुप्त धमगाये, शिला चौधरी, अमेरिका चाचेरे,ज्योती ठाकुर, माधुरी बोमले,योगिता राऊत,ग्रामरोजगार सेवक उमेंद्र ठाकुर, संगणक परिचालक रोहित पांडे, लिपीक सुनिल वाघाडे,परिचर अजय नेवारे, योगेश गमधरे,नर्स दिक्षा पटले,चेतना टेंभरे,विनिता मेश्राम,सेविका पुष्पा कोहरे,अनुसया राहांगडाले यांनी सहयोग केले.