‘त्या’ युवकाचा मृतदेह फासावर टांगलेला आढळला

0
62

सडक अर्जुनी : तालुक्यातील घोटी येथून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह पांढरी/डुंडा शेतशिवारात फासावर टांगलेला आढळला. ही बाब आज (ता.७) उघडकीस आली. गणेश बळीराम मेंढे (२८) रा.घोटी असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे उलटसुलट चचेर्चा पेव फुटले आहे.
तालुक्यातील घोटी येथील गणेश मेंढे हा पांढरी येथे वेल्डिंगच्या दुकानात काम करुन उदरनिर्वाह करीत होता. नेहमीप्रमाणे ५ मे रोजी कामावर जाण्यास तो घरून निघाला. मात्र, सायंकाळपयर्ंत तो घरी परतलाच नाही. दरम्यान त्याचा शोध घेतला असता काही थांगपत्ता लागला नाही. यामुळे डुग्गीपार पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार नोंद करण्यात आली. अशातच आज, पांढरी/डुंडा शेतशिवारात गुराख्यांना गणेश मेंढे याचा मृतदेह फासावर टांगलेला दिसून आला. विशेष म्हणजे, त्याने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असावी, त्यामुळे त्याचा मृतदेहातून दुगर्ंध येवू लागले होते. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र त्या मागच्या कारणाला घेवून परिसरात उलटसुलट चचेर्ला पेव फुटले आहे. पुढील तपास डुग्गीपार पोलिस करीत आहेत.