तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

0
50

देवरी 08: देवरीच्या एका तरुणाने विष प्राशन करून आपले जीवन संपवले आहे.मनीष शेषराव निर्वाण (25) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने रात्री विष प्राशन केले. प्रकृती खालावली असता देवरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रकृती चिंताजनक असल्यामुळे देवरी वरून गोंदियाच्या रुग्णालयात हलविले असता तिथे त्याचा मृत्यू झाला.मनीषच्या आत्महत्यामुळे कुटुंबावर दुःखाचे डोंगर उभे राहिले असून कुटुंबात फक्त आई आणि एक बहीण आहे.आत्महत्येचा कारण काय आहे हे कळू शकले नाही.