आंतरजातीय लग्न केल्यामुळे आईवडिलांनी मुलीला फरफटत नेले घरी

0
38

अमरावती : ८ मे – दोघांचे एकमेकांवर प्रेम. पण दोघेही वेगवेगळ्या समाजाचे असल्याने अशात दोघांनी आर्य समाज मंदिरात जावून संमतीने विवाह केला. मात्र, त्यांच्या विवाहाला मुलीच्या आईवडिलांसह नातेवाईकांचा विरोध होता. तरीही मुलगी आपल्या जोडीदाराच्या घरी आनंदात गेली. पण मुलीचे कुटुंबीय मुलाच्या घरी पोहोचले. यावेळी चर्चा सुरू असताना मुलीच्या कुटुंबीयांनी घरात येऊन तिला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोर्शी तालुक्यातील अंबाडा गावात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण मोर्शी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अचानक घडलेल्या या घटनेने मुलाकडील नातेवाईक घाबरले आहे. मुलीला नेवू नये, या करता मुलाच्या आई-वडिलांनी मध्यस्थी केली. यावेळी दोन्ही कुटुंबातील सदस्यांमध्ये हाणामारी झाली. मुलीच्या नातेवाईकांनी चक्क मुलीला उचलून नेल्याच्या प्रकारामुळे अंबाडा गावात खळबळ उडाली. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
हा प्रकार ४ मे रोजी घडला आहे. या प्रकारणाचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल आहेत. या घटनेनंतर मुलीच्या सासरकडील मंडळींनी मोर्शी पोलीस स्टेशमध्ये जावून तक्रार दिली. मात्र. पोलिसांनी काहिच कारवाई केली नसल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे.