अमानुष कृत्य करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर आरोग्य विभाग कार्यवाही करणार का ?

0
21

■ देवरी परिसरात चर्चेला आले उत
देवरी,ता.३१ : सविस्तर वृत्त असे की, २४ मे रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान संगीता मुकेश भाजीपाले (पत्नी) ही जेवण करीत असताना संगीताचे पती मुकेश धनराज भाजीपाले, आणि त्याचा भाऊ अनिल धनराज भाजीपाले मु. सालई , व इतर दोन व्यक्ती महेंद्र नीलारांम डोये, देवानंद मोरेश्वर रामटेके यांना सोबत घेऊन संगीता व तिचे सासरे धनराज शंकर भाजीपाले यांना अमानुष पणे मारहाण करण्यात आली होती. तेव्हा संगीता ही आपला जीव वाचवून घराबाहेर निघून व देवरी पोलीस स्टेशन येथे जाऊन आपली आपबिती सांगितली व तक्रार नोदवली. सदर तक्रारकरती महिलेचे डॉ. कडून तिला झालेल्या मारहाणीचे तपासणी सुधा करण्यात आली. सदर आरोपीवर देवरी पोलीस स्टेशन मध्ये अपराध क्रं. १२१/२०२२ चे अंतर्गत कलम ३५४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भा. द.वी अंतर्गत गुन्हा नोंदविला. आरोपींना (ता.३०मे ) रोजी अटक करून सत्र न्यायालय गोंदिया येथे हजर केले. न्यालयाकदून त्यांना अंतरिम जमानत देण्यात आली. परंतु मुकेश धनराज भाजीपाले हा ग्रामीण रुग्णालय देवरी येथे कंत्राटी फार्मसिस्ट पदावर कार्यरत आहे. त्यामुळे अशा अशोभनीय कृत्य करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सबक द्यायला हवी की नाही ? अशी चर्चा देवरी शहरात जोर धरू लागली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग त्याच्यावर काय कार्यवाही करते याकडे शहरातील जनतेचे लक्ष लागून आहे.