40.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home गुन्हेवार्ता प्रेम प्रकरणातुन युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

प्रेम प्रकरणातुन युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

0
301

blank

>>तुमसर – देव्हाडी मार्गावरील घटना.

>अज्ञात मारेकरी फरार

तुमसर – तुमसर शहरातील प्रेमप्रकरणातून युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची घटना ३जुन रोजी सायंकाळी ७ वाजता दरम्यान तुमसर -देव्हाडी मार्गावरील हॉटेल प्रसाद समोर घडली. सचिन गजानन मस्के (३०)
रा.नेहरूनगर तुमसर असे मृतकाचे नाव आहे. सदर घटनेतील आरोपी वृत्त लिहोस्तर फरार होते. सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाल्याची समजते.

तुमसर शहरात ३ जुन रोजी प्रेम प्रकरणातून युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली माहितीनुसार मृतक सचिन सोबत त्यांच्या दुचाकी क्र एम एच ३६ एन ९५५७ जवळ काही अज्ञात युवकांसोबत हाँटेल प्रसाद समोर दुचाकीजवळ थांबले होते. दरम्यान आरोपी व मृतका मध्ये आपसामध्ये वाद- विवाद झाला दरम्यान अज्ञात आरोपींनी धारदार तलवारीने सचिनच्या मानेवर सपासप वार करून यमसदनी पाठवले.त्यात सचिन रक्ताच्या थारोळ्यात खाली जागेवरच मृत झाला .अज्ञात मारेकरी घटनास्थळावरून पळ काढून निघाले. मात्र हॉटेल प्रसादला तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कँमरेच्या फुटेजमध्ये घटना कैद झाल्याची माहिती झाली. सदर घटनेची माहिती तुमसर पोलिसांना देण्यात आली असता घटनास्थळाला तुमसर उपविभागीय पोलिस अधिकारी संतोषसिंह बिसेन,पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर दाखल झाले होते. माहितीनुसार सदर घटना प्रेमप्रकरणातून घडल्याचे कळते वृत्त लिहीपर्यंत मारेकऱ्यांना अटक करण्यात आलेली नव्हती. सदर घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.