| स्थानिक गुन्हे शाखा, लोहमार्ग नागपूर पोलिसांना यश
नागपूर : गर्दीचा फायदा घेवून रेल्वे प्रवाशांचे मनीपर्स व मोबाइल चोरणार्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा, लोहमार्ग नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.
सविस्तर असे की, 6 जून 2022 रोजी फिर्यादी वसिम अक्रम ताजमूल शेख (वय 24) रा. मुर्शिदाबाद पश्चिम बंगाल, मोहम्मद आसिफ अतिकउल्ला सिद्दिकी (वय 26) रा. मंगला बिलसपूर, छ.ग. हे गाडी हावडा-कुर्ला ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या मागील जनरल कोच डी/2 मध्ये शालिमार ते कुर्ला असा प्रवास करीत होते. गाडी रेल्वे स्थानक नागपूरच्या प्लाटफार्म 2 आली. दरम्यान ते इटारसी एंडकडे प्लाटफार्मवरील पाण्याच्या नळाजवळ पाणी घेण्याकरिता गेले. त्यावेळी प्रवाशांच्या गर्दीमध्ये त्यांच्या पॅंटच्या खिशात ठेवलेले मनीपर्स आतील समानासह किंमत 4 हजार रुपये व 950 रुपये अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेवून चोरी केले. फिर्यादीच्या अशा लेखी तक्रारीवरून रेल्वे पोलीस ठाणे नागपूर येथे भादंविच्या कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर टीमने समांतर तपास सुरू केले. प्लाटफार्मवर लक्ष ठेवून असताना संशयावरून आरोपी गोळू मेडका काळे (वय 22), डिरी मेडका काळे (वय 20) व राहुल सूरज श्रीवास (वय 22) तिन्ही रा. फिरस्ता, के.पी. ग्राऊंड, नागपूर हे मिळून आले. संशयावरून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ सदर दोन्ही गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल व एका प्लाटफार्मवर रेल्वे प्रवाशाच्या चोरी केलेला 12 हजार रुपये किंमतीचा असा एकूण 16 हजार 850 रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर गुन्हा त्यांनी संगनमताने केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून आरोपींना पुढील कार्यादेशीर कार्यवाहिकरिता नागपूर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांना यापूर्वी सुद्धा मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आले होते.
ही कारवाई लोहमार्ग नागपूरचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी हेमंत शिंदे, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, सहायक फौजदार सुरेश राचलवार, पोलीस हवालदार नामदेव शहारे, रविंद्र सावजी, महेंद्र मानकर, रविकान्त इंगळे, पोलीस नाईक विनोद ख्रोब्रागडे, अविण गजबे, नितीन शेंडे, पोलीस शिपाई अमित त्रिवेदी, राहुल यावले, गिरीश राऊत, रोशन अली सय्यद, चन्द्रशेखर मदनकर यांनी केली.