चंदपूर –तुमच्या गाडीचे आईल लिकेज होत आहे, अशी बतावणी देऊन कारमधील ११,१0,000 रुपयांची बॅग घेऊन फरार झालेल्या टोळीला रामनगर पोलिस व डी.बी. पथकाने आंध्रप्रदेश येथून अटक केली आहे. आरोपींत चार पुरुष व दोन महिला आरोपींचा समावेश आहे.
पोलिस स्टेशन रामनगर येथे २0 मे २0२२ रोजी फिर्यादी मोनीश शिवकुमार बघेल (वय २८), रा. बाबुपेठ वॉर्ड, महादेव मंदिरजवळ, चंद्रपूर यांनी तक्रार दिली की, सिद्धार्थ हॉटेलच्या बाजूला असलेल्या एस.बी.आय. बँक समोरून आपल्या ताब्यात होंडा अमेझ गाडी क्र. एम.एच. ३४ बी एफ. ९0११ चे जवळ एक अज्ञात इसम घेऊन फिर्यादीला सांगितले की, तुमच्या गाडीचे आईल लिकेज होत आहे. यावरून फिर्यादी व चालकांनी गाडीचे खाली उतरून इंजनची पाहणी केली असता, यातील दोन अज्ञात इसमांनी संधीचा फायदा घेऊन कारमध्ये ठेवलेल्या ११,१0,000 रुपयांची पैशाची बॅग घेऊन फरार झाले होते. यावरून पोलसांनी ३७९, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करून उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षक राजेश मुळे पोस्टे रामनगर यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्य़ातील अज्ञात आरोपीतांचा व चोरीस गेलेल्या रोख रक्कमचा शोध घेण्यासाठी डी.बी पथकातील दोन पथके तयार करण्यात आली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व सायबर पोलिसांच्या मदतीने तांत्रिक बाबीचा तपास करण्यात आला.
घटनास्थळावरील प्राप्त फुटेज व तांत्रीक बाबी वरून अज्ञात आरोपीतांची माहिती प्राप्त होताच गुन्हे शोधपथकातील अधिकारी व कर्मचार्यांनी अज्ञात आरोपींचा दोन दिवस तपास करून अज्ञात आरोपी तेलंगना आंध्रप्रदेश, कनार्टक (यादगीर), सोलापुर (पंढरपूर) येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करून पी.एच. बाबू शंकररैया छल्ला (३0), सी.एच. अलेक्झांडर रमेश छल्ला (वय २८), सी.एच. प्रसंगी येल्लीया सन्नी छल्ला (वय ३0), नानी नागेशराव येरगदीमल्ला (वय १८), कल्पना किशोर कुन्चाला (वय ३७), कुमारी बाबु गोगुल्ला (वय २७) सर्व रा. कपराल्ला तिप्पा, पोस्ट धामवरम, ता. बोगोले, जिल्हा नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश या आरोपींताना रेल्वे स्टेशन चंद्रपूर येथून अटक करण्यात आली. सदर आरोपींकडून संपूर्ण माल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींनी सांगितले की, ते ज्याठिकाणी गुन्हा करायचे असते त्या शहरामध्ये येऊन सदर महिलांचे मार्फतीने रूम भाड्याने करून राहतात व अंदाजे १५ ते २0 दिवस शहरामधून बँका तसेच ज्वेलर्स शॉप यांच्यावर नजर ठेवून येणार्या जाणार्या लोकांचा अभ्यास करतात व बँकेमधून पैसे काढून चार चाकी व दुचाकी वाहनाने जाणार्या लोकांना टारगेट करून त्याचे वाहनाचे खाली ऑईल टाकून, अंगावर थुंकून, घाण टाकून, गाडीचे टायर पंक्चर आहे अशी बतावणी करून व इत्यादी प्रकाराने त्यांचे लक्ष विचलित करून त्यांच्या गाडीमध्ये ठेवलेले पैसे घेऊन पळून जातात. यातील आरोपींनी यापूर्वी महाराष्ट्रमध्ये मुलुळ, भांडूक, पनवेल, अमरावती, वरोरा तसेच चंदपूर तसेच इतर राज्यातसुद्धा अश्याच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. वरील कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागिय पोलिस अधिकारी, सुधीर नंदनवार सा. यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलिस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि हर्शल अकरे, पोउपनि विनोद भुरले, पो.हवा. रजनीकांत पुठ्ठावार, पेतरस सिडाम, प्रशांत शेंदरे, नापोशि विनोद यादव, किशोर वैरागडे, चिकाटे, आंनद खरात, निलेश मुडे, पांडुरंग वाघमोडे, सतीश अवथरे, लालू यादव, पोशि विकास जुमनाके, हिरालाल गुप्ता, संदिप कामडी, सुजीत शेंडे, विकास जाधव, मनापोशि भावना रामटेके, तसेच सायबर सेल, चंद्रपूर येथील नापोशि प्रशांत लारोकर, छगन जांभुळे, पोशि अमोल सावे यांनी केलेली आहे.