गडचिरोली नप स्वच्छ सर्वेक्षण पुरस्काराने सन्मानित

0
10

गडचिरोली-स्वच्छ भारत अभियान हे महात्मा गांधीच्या स्वच्छ देशाच्या संकल्पनेचा सन्मान व्हाव म्हणून शासनाने सुरू केला आहे. २ ऑक्टोबर २0१४ रोजी प्रारंभ झालेले हे अभियान आज संपूर्ण देशात लोकांनी मनापासून स्विकारले आहे. स्वच्छ सर्वेक्षणाला २0१६ मध्ये सुरुवात झाली तेव्हा ७३ शहरांचा त्यात समावेश होता. सन २0२२ मध्ये ४३५४ शहरांचे सर्वे करण्यात आले. यात ६२ कॅटोनमेंट बोर्डाचाही समावेश होता. केंद्र शासनाने १ ऑक्टोबर २0२२ रोजी स्वच्छ भारत अभियानाचा निकाल जाहीर केला. यात ५0 हजार ते १ लाख लोकसंख्येच्या स्वच्छ शहर नागरिकांच्या अभिप्राय श्रेणी गडचिरोली नगर परिषदेने पुरस्कार प्राप्त केला आहे.
सदर पुरस्कार राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी, केंद्रीय नगर विकास राज्य मंत्री कौशल किशोर, केंद्रीय नगर विकास सचिव मनोज जोशी, सहसचिव रूपा मिर्शा यांचे उपस्थितीत दिल्ली येथे वितरण करण्यात आले. सदर पुरस्कार न.प.चे विद्यमान मुख्याधिकारी नरेंद्र बेंबेर, तत्कालीन मुख्याधिकारी विशाल वाघ, उपमुख्याधिकारी तथा प्र. आरोग्य विभाग प्रमुख रवींद्र भंडारवार व स्थापत्य अभियंता अंकूश भालेराव यांनी स्वीकारला.
सन २0२२ मध्ये तत्कालीन मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्र. आरोग्य विभाग प्रमुख रवींद्र भंडारवार यांनी त्यांच्या अधिनस्त आरोग्य विभागातील कर्मचारी, नियमित व कंत्राटी सफाई कर्मचारी यांच्यासमवेत योग्य नियोजन करून गडचिरोली नगर परिषदेने स्वच्छतेच्या कामात अविरत पर्शिम घेतले. त्यामुळे गडचिरोली नगर परिषदेने सन २0२२ मध्ये हरीत महा कंपोस्ट बॅंड्र डस्रील्ल ऊीीूं३्रल्ल ऋ१ी (डऊऋ++) व स्वच्छ सर्वेक्षणात देखील पुरस्कार प्राप्त केला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २0२२ मध्ये गडचिरोली नगर परिषद देशात पश्‍चिम विभागातून ५१ व तर महाराष्ट्र राज्यातून ३0 वे क्रमांक पटकावले आहे.