32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता पती-पत्नीची झोपेतच गळा चिरून निर्घृण हत्या

पती-पत्नीची झोपेतच गळा चिरून निर्घृण हत्या

0
172

blank

तुमसर-पती-पत्नीची झोपेत असतानाच गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. गुरुवारी मध्यरात्रीनंतरही ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे.शुक्रवारी सकाळी घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा ही घटना उघडकीस आली. सुशील बोरकर व सरिता बोरकर, अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. उल्लेखनीय म्हणजे, दुसऱ्या खोलीत त्यांची दोन्ही मुले झोपलेली होती.

blank