अवैधरित्या गौणखनिजाची वाहतुक टक्ट्रर जप्त

0
30

गोंदिया,दि.07ः अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करून कोणताही अधिकृत परवाना नसतांना वाळू चोरीचा व्यवसाय करणाऱ्यांवर छापा कारवाई, 6 लाख, 28 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून दंडात्मक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

गोंदिया जिल्ह्यात अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करून कोणताही अधिकृत परवाना नसतांना वाळू, गौण खनिजाची चोरी करून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाने कारवाई करीत ट्रक्टर जप्त केले.यामध्ये पोउपनि विघ्ने यांचे नेतृत्वातील पथकाने पो.स्टे.आमगाव अंतर्गत कालीमाटी ते गिरोला जाणाऱ्या टेकरी गावाजवळ परिसरात मौजा- पोकरटोला नाल्यावरून अवैधरित्या वाळू चे उत्खनन करून वाळू चोरी करून विना क्र. चा ट्रॅक्टर आरटीओ पासिंग क्र.MH 35AG 3891 *चे ट्रॉली मध्ये *1 ब्रास वाळू, चालक मालक नामे – मनोहर योगेश्वर फरकुंडे रा. भोसा ता. आमगाव हा वाहतूक करतांना दिनांक 06/11/2022 रोजी दुपारी 12.00 वाजता दरम्यान मिळून आल्याने कारवाई केली.तसेच ट्रॅक्टर क्र.MH 35 AG 3891,ट्रॉली रेतीसह पो. स्टे. आमगाव येथे जमा करुन दंडात्मक कारवाईकरिता तहसीलदार आमगाव यांना पत्रव्यवहार करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे निर्देश व आदेशाप्रमाणे पो.नि. स्थागुशा श्री आव्हाड यांचे मार्गदर्शनात, पोउपनि विघ्ने पो.अंमलदार पो हवा. देशमुख, मिश्रा, ठाकरे, पटले , तुरकर, शेख, पोशि. भांडारकर यांनी केली आहे.