केवळ ओबीसींचीच नव्हे तर सर्वच जातधर्माची जातनिहाय जनगणना करावी –प्रा संदेश चव्हाण

0
28

शेगाव येथे पार पडले ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी चर्चासत्र व समेलंन

शेगाव दि.०7: शिक्षणात सुधारणा नाही वंचिताना शिक्षण नाही अशात साखर शाळाची गरज काय आमच्या मुलांनी उसतोडणी करुच नये यासाटी काम व्हायला हवे.केवळ ओबीसींचीच नव्हे तर सर्वच धर्म जातींतील सर्वाची सम्रग जनगणना करण्यात यावी.जातगणनेशिवाय आमचा विकास शक्य नाही हे सर्वच राजकीय नेते कार्यकर्त्यांनी पक्षभेद विसरून स्विकारायला पाहिजे.प्रस्थापित सनातनी लोकांनी आपल्या८० टक्के बहुजन समाजाला गुलाम केले आहे.त्यां सनातनी विचारधारेच्या विरोधात लढाईची ही वेळ आहे.म्हनून जनगणना होण आवश्यक आहे़.प्रस्थापित विरुध्द विस्थापीत असा लढा आपला आहे असे विचार गौरसेनेचे राष्ट्रिय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण यांनी व्यक्त केले.ते ओबीसी-व्हीजेएनटी-एसबीसी समन्वय समिति द्वारा  6 नोव्हे 2022 ला आदर्श मंगल कार्यालय, आनंद विहार येथे आयोजित ओबीसी चर्चासत्र व सम्मेलनात बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन उपाध्यक्ष ओबीसी जनमोर्चाचे प्रा.रमेश पिसे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय गोरसेना अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण होते.विचारमंचावर संघर्ष वाहिनीचे  दीनानाथ वाघमारे,ओबीसी अधिकार मंचचे खेमेन्द्र कटरे,ओबीसी जनमोर्चा उपाध्यक्ष विलास काळे,ओबीसी सेवा संघाचे गोपाल सेलोकर,मोहेंदपूर येथील भाऊलाल बाबर,दत्तात्रय ठाकरे खामगाव,ओबीसी संघर्ष कृती समितीचे कैलास भेलावे,प्रा.अनिल डहाके,प्रा.उमेश बुलढाणा येथील अतुल भुसारी ,खामगावचे  सुधीर सुर्वे ,डॉ.प्रमोद पाचुर्डे अमरावती,अमोल कंकड अकोला,श्रीमती सुनिता काळे हे उपस्थितीत होते.

पुढे बोलतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण म्हणाले की देशामध्ये ज्याच्याकडे ताकद त्यांनी आपल्या शक्तीचा वापर करुन आमच्या बहुजन समाजाच्या हक्क अधिकारावर गदा आणल्याचे चित्र स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आहे.मी सर्वसामान्यात जाऊन काम करणारा कार्यकर्ता आहे.ओबीसी व्हीजेएनटी एसबीसीनी एकत्रित येऊन  संघर्षासाटी रस्त्यावर यावे लागेल.आपण कुटे कमी पडतो यावरही चिंतन करुन जनसामान्यांची चळवळ देशपातळीवर काम करावे लागेल.ओबीसी व्हीजेएनटी एसबीसीची परिस्थिती आज दयनीय झाली आहे.आपण सगळे एकच आहोत हे समजले पाहिजे.राजकीय नेते आपल्याला भावनिक आवाहन करुन सत्तेत पोचतात ते आपले नाहीत हे मान्य करावे लागेल.समेलनाचे उदघाटक ओबीसी जनमोर्चा उपाध्यक्ष प्रा.रमेश पिसे म्हणाले की, आपल्याच मुलाबाळांच्या विषयासाटी जेव्हा आपण एकत्र येण्याऐवजी टाळाटाळ करणे म्हणजे स्वसमाजाचा व कुटुबांच्या विकासात बाधा निर्माण करतो हे समजून घ्यायले हवा.तात्यासाहेब होते म्हणून बाबासाहेब आंबेडकर घडले व शिवराय़ ़समोर आले.बाबासाहेबांनी घटना लिहिण्यापुर्वीच पिप्लस संस्थेची घटना लिहितांना एससी एसटी ओबीसींना समान वाटा दिले होते.जातनिहाय जनगणनेशिवाय आपल्या समाजाचा विकास अश्यक आहे़.१२५-१३० खासदार संसदेत असूनही आमचे हक्क अधिकार व जनगणना होत नाही का याचा विचार जेव्हा करतो तेव्हा ते राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असतात ओबीसींचे नाही दिसून येते.आपण आपले अमुल्य मत विकणे बंद करण्याची वेळ असून समाजकारणासोबत राजकारणांची जोड गरजेंची झाली आहे.सविंधानाचे उद्देशिकेचे वाचन करुन लोकांना माहिती पोचवा.
प्रास्तविक सयोंजक उमेश कोरारम यानी केले.प्रास्तविकात पश्चिम विदर्भातील ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी समाजाला सोबत घेऊन ओबीसींचे संघटन सामाजिक पातळीवर बळकट करण्यासाटी हे आयोजन आह़े.ओबीसींचे महामंडळ व महाज्योती संस्थेची माहिती जनतेला करवून देत ओबीसींची जातनिहाय जनगणनेसाठी सरकारवर दबाव घालणेकरीता आयोजन असल्याचे सांगितले.भाऊलाल बाबर म्हणाले की आपण देशाचा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा करीत देशाला महासत्ता होण्याचे स्वप्न बघत असतानाच मात्र आमचा नाथजोगी समाजातील लहानबालकापासून ते वयोवृध्दापर्यत सर्वांना भटकंती करीत भिक्षा मागून पोट भरावे लागते.यावरुन आम्ही कुटल्या महासत्तेची स्वप्न बघतो अशा प्रश्न उपस्थित केला.
विलास काळे म्हणाले की ओबीसी जनगणनेसाटी देशव्यापी आंदोलनाचा मार्ग पत्करण्याची वेळ आली असून त्याकरीता भ्रमणमार्ग करणार आहोत.जातीच्या कचाट्यातून बाहेर येत प्रवर्गाच्या जाळ्यात एकत्रित व्हावे लागणार आहे.ओबीसी समाजाचा उध्दारकर्ता कुणी असेल तर डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच होत.ओबीसीची मोजणी झाली तर त्यांना त्यांचा हिस्सा द्यावे लागेल म्हणून जनगणना होत नाही ही खरी भूमिका समजली पाहिजे़.एक झेंडा एक बँनर व एक संघटना आवश्यक आहे.२८ नोव्हेबंर ते ६ डिसेबंरपर्यत स्मृतीपर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.
यावेळी प्रा़ उमेश सिंगनजुडे,भाऊलाल बाबर,माधव वांगरे ,गोपाल सेलोकर,सुनिता काळे यांनीही विचार व्यक्त केले.ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावे.१००टक्के शिष्यवृतती सर्वच  अभ्यासक्रमात मिळायला हवे.वसतीगृह सुरू त्वरीत सुरू करण्यात यावे.आर्थिक विकास महामंडळावर चांगले संचालक नेमण्यात यावे.महाज्योती संस्थेला लोकाभिमुख करण्यात यावे. ओबीसी समाजाचा जनगणने शिवाय  सामाजिक आर्थिक विकास शक्य नाही या विषयावर तसेच -ओबीसी महामंडळ महाजोती ओबीसी वस्तीगृह शिष्यवृत्ती विषयावर चर्चा करण्यात आली.
विदर्भातील सर्व ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी कार्यकर्त्य  सहभागी झाले होते.संचालन गोपाल देशमुख यांनी केले तर आभार खेमेंद्र कटरे यांनी मानले.