38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता अज्ञात व्यक्तीने लावली धान्याच्या पुंजन्याना आग

अज्ञात व्यक्तीने लावली धान्याच्या पुंजन्याना आग

0
39

blank

आंभोरा येथील प्रकार

गोंदिया (ता.३) -शेत शिवारात एकत्र करून ठेवलेल्या धानाच्या पुंजन्याना कुणी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना गोंदिया तालुक्यातील अंभोरा येथे शनिवारी(ता.3)सकाळी उघडकीस आली. यात जवळपास सहा शेतकऱ्यांचे धनाचे पुंजने जळून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील शेतकरी हेमराज भैयालाल पटले,ओमकार नेवल पटले,भैयालाल सोमाजी पटले, राजकुमार सोमाजी पटले, व रेखलाल गोसावी चौधरी यांनी आपआपल्या शेतातील धान एकत्र करून शेतातच पुंजने करून ठेवले होते.अशातच शुक्रवारच्या(ता.2) रात्री कुणी अज्ञात व्यक्तीने या सर्व शेतकऱ्यांच्या धान पुंजन्याना आग लावली. त्यात त्यात हेमराज भैयालाल पटले यांचे तीस हजार, ओंमकार नेवल पटले यांचे तीस हजार,भैयालाल सोमाजी पटले यांचे तीस हजार, राजकुमार सोमाजी पटले यांचे तीस हजार व रेखलाल गोसाई चौधरी यांचे जवळपास पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.सदर घटनास्थळी आग लावणाऱ्या इसमाची चप्पल आढळून आली. त्यामुळे सदर प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी करण्यात यावी तसेच सदर शेतकऱ्यांना शासनातर्फे तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी पूर्व पं.स. सदस्य प्रकाश डहाट,पूर्व सरपंच चिंतामण चौधरी व व शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

blank