
अर्जुनी मोर.दि.03 :-– नवेगांवबांध कडून लाखांदूरकडे जात असलेल्या मिक्सर मशिनच्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने मोटारसायकलस्वार व्यक्तीचा उपचाराकरीता नेत असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना अर्जुनी मोर. येथील जुन्या न्यायालयासमोर आज दि.3 डिसेंबरला सकाळी 5:45 वाजेच्या दरम्यान घडली.यामधे राहुल गोविंदराव ब्राम्हणकर वय 50,रा.अर्जुनी मोर.असे मृतकाचे नाव आहे.
याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील मृतक राहुल गोविंदराव ब्राम्हणकर हे सकाळी 5:45 वाजेच्या दरम्यान आपल्या मोटार सायकल हिरो होंडा एम.एच.36 A 7200 या दुचाकीने फेरफटका मारुन घरी परत जात असता नवेगांवबांध कडून लाखांदूरकडे जात असलेल्या बिना नंबरच्या नविन मिक्सर मशिन ट्रकच्या ( हाॅकजाॅक मशीन )चालकाने वाहन वेगात व बेजबाबदारपणे चालवून मोटार सायकलला धडक दिली.या धडकेत मोटारसायकलस्वार राहुल ब्राम्हणकर हे गंभीर जखमी अवस्थेत पडून असल्याची माहिती मिळताच ठाणेदार सोमनाथ कदम आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. जखमी राहुलला ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे हलविले.लगेच प्राथमिक उपचार करुन नागपूर येथे नेत असताना राहूल ब्राम्हणकर यांचा वाटेतच मृत्यू झाला.राहुल ब्राम्हणकर हे बहुउद्देशिय विद्यालय अर्जुनी मोर. येथे कर्मचारी होते.ट्रकचालक रोमीसिंग हरनिंदरसिंग टाटानगर जमशेदपूर यांचे वर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार सोमनाथ कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस नायक मोहन कुहीकर, पोलीस हवालदार रोशन गोंडाणे करीत आहेत.