घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगारांला, 5 वर्षे सश्रम कारावास

0
10

गोंदिया-  सन २०१७ मध्ये फिर्यादी  सतिश गणपतराव राऊत रा. विवेकानंद कॉलोनी मामा चौक, गोंदिया यांचे राहते घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागीने व इतर साहीत्य असे ३,१४,०००/- रूपयाचे मुद्देमाल चोरून नेल्याने पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे ३५० / २०१७ कलम ४५७,३७०, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद होता.

तसेच सन २०१८ मध्ये फिर्यादी श्री. ओमप्रकाश रामेश्वर प्रसाद शर्मा रा. पंचायत समिती कॉलोनी गोंदिया यांचे राहते घराचे कुलूप तोडुन ४ मोबाईल व सोन्या-चांदीचे दागीने तसेच रोख रक्कम असा एकुण ६३,६००/- रूपयाचे मुद्देमाल चोरून नेल्याने अप.क्रं. ३२३ / २०१८ कलम ४५४,४५७,३८० ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद होता.

दोन्ही गुन्हयाचे अनुषंगाने घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार, आरोपी नामे- शंकर उर्फ गुरू राजाराम पटले वय २४ वर्ष, रा. संजयनगर, गोंदिया यास अटक करण्यात येवून सदर दोन्ही गुन्ह्याचे तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर करून फौजदारी खटले अनुक्रमे क्र.६७ /२०१८, २७०/२०१९ प्रमाणे खटले चालविण्यात आले.

सदर दोन्ही खटल्याचे सुनावणीत आरोपी -शंकर उर्फ गुरू राजाराम पटले वय २४ वर्ष, रा. संजयनगर, गोंदिया यांचे विरूध्द साक्षपुराव्यावरून दोषसिध्द झाल्याने मा. मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी, न्यायालय गोंदिया यांनी दिनांक २१ / १२ / २०२२ रोजी बुधवारी खटला क्रं. २७० / २०१९ मध्ये ५ वर्ष सश्रम कारावास आणि १०००/- रू. द्रव्यदंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास ३ महिने कारावासाची शिक्षा व खटला क्रं. ६७/२०१८ यामध्ये ५ वर्ष सश्रम कारावास आणि १०००/- रू. द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे .आरोपी शंकर उर्फ गुरू राजाराम पटले वय २४ वर्ष, रा. संजयनगर, गोंदिया हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असुन वरील प्रमाणे शिक्षा झालेल्या दोन्ही गुन्हयांचा तपास अनुक्रमे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर, सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी केलेला आहे.दोन्ही खटल्याचे युक्तीवाद सहायक सरकारी अभियोक्ता सुरेश रामटेके यांनी केले असुन न्यायालयीन कामकाज पो. हवा. ओमराज जामकाटे, पोशि किरसान यांनी केलेला आहे