27.4 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home गुन्हेवार्ता तक्रारकर्ताच निघाला चोर,चार तासांत गुन्हा उघड

तक्रारकर्ताच निघाला चोर,चार तासांत गुन्हा उघड

0
38

 गोंदिया- घरी चोरी झाल्याची तकह्यार देणारा तकह्यारकर्ताच चोर निघाला असल्याचा प्रकार पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाले. विशेष म्हणजे अवघ्या चार तासांत पोलिसांनी चोरीचा उलगडा केला. गोरगाव शहरातील त्रिमूर्ती चौक येथील घरी रविवार, ८ जानेवारी रोजी रात्री ७ ते ८ वाजेच्या दरम्यान चोरी झाल्याची तक्रार रवींद्र कपुरचंद रहांगडाले यांनी गोरेगाव पोलिसात दिली.
यावेळी तक्रारकर्त्याने घरचे सगळे सदस्य शहरातील राधाकृष्ण मंदिर येथे महाप्रसाद घेण्याकरीता गेले असता कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरी करून रोख व सोन्याचांदीचे दागिणे, असा १ लाख ३0 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद केले. पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिस पथकाने घटनास्थळाला भेट देत आजू-बाजूचे परिसर व सी. सी. टी. व्ही. फुटेजची तपासणी केली असता तक्रारदार रवींद्र रहांगडाले या घटनेच्या वेळी घरी येऊन साधारण २0 मिनिटे थांबल्याचे प्रथमदश्री दिसून आले. यावरून रविंद्र रहांगडाले याची कसुन विचारपूस केली. दरम्यान, त्याने कर्जबाजारीपणामुळे स्वत:च्या घरी चोरी केल्याची कबूली दिली. रवींद्रला ताब्यात घेऊन गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केले.