24.6 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home गुन्हेवार्ता वनरक्षकाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण,तीन आरोपीवर गुन्हा दाखल

वनरक्षकाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण,तीन आरोपीवर गुन्हा दाखल

0
32

गोंदिया,दि.12-रेतीचा ट्रॅक्टर अडविल्याचा राग मनात धरून वनरक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली.ही घटना बंध्या ते खोळदा पांदण रस्त्यावर बुधवारी सकाळी घडली.या प्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.वनरक्षक सचिन पुरुषोत्तम गावंडे व त्यांचे सहकारी कर्मचारी सचिन अभिमन मेश्राम,दीपक बुद्धू सापा व लहानू सखाराम नैताम हे बुधवारी सकाळी १०७२(ए) खोळदा बिटमधील बंध्या ते खोळदा पांदण रस्त्यावर गस्तीवर होते.गोपीनाथ देशमुख व लक्ष्मण देशमुख यांनी रेतीचा ट्रॅक्टर अडविल्याचा राग मनात धरून वनरक्षकांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली.वनरक्षकाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली.सुमारे एक ब्रास रेतीची चोरी केली.आरोपींनी शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याने महागावचे वनरक्षक सचिन गावंडे (डे ३३) यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी गोपीनाथ दौलत देशमुख
(५५),लक्ष्मण गोपीनाथ देशमुख (३०) व रणवीर नगरधने (४०) तिन्ही रा महागाव याचेविरुद्ध कलम ३५३,३३२,१८६,३७९,३४ भादंवीचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक विलास नाळे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संभाजी तागड,पोलीस हवालदार महेंद्र पुण्यप्रेडीवार तपास करीत आहेत.