जिपच्या शाळेत अग्नीतांडव: जुनी इमारत जळून संपूर्ण राख

0
24

आमगाव- शहरालगत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत रात्री अचानक आग लागल्याने जुनी इमारत जळून संपूर्ण खाक झाली. आग कश्यामुळे लागली याचे कारण अद्यापही कडू शकले नाही, सुदैवाने रात्रीचा वेळ असल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही.

जिल्हा परिषद शाळेच्या स्वयंपाक खोलीत आग लागली. आगीने बाजूला असलेल्या चार वर्ग खोल्यांना देखील आपल्या कवेत घेतले. आग इतकी भयानक होती की स्वयंपाक खोलीतील साहित्यासह बाजूला असलेल्या वर्गखोलीतील साहित्य देखील जळून राख झाले. लगेच याची माहिती गावकऱ्यांनी अग्निशामक विभाग आणि पोलिसांना दिली असून आगीवर नियंत्रण मिळवे पर्यंत स्वयंपाक खोलीसह चारही वर्ग खोल्या जाळून राख झाल्याने विद्यार्थ्यांना आता कुठे शिकवावे आसा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.