500 बाटलांसह 1.17 लाखांचा मुद्देमाल जप्त : विशेष पथकाची कारवाई

0
11

गोंदिया : शहरातील यादव चौक हनुमान मंदिर परिसरात दुचाकीने अवैधरित्या दारूची वाहतूक करणाºया आरोपीला पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने पकडले. ही कारवाई २४ जानेवारी रोजी करण्यात आली. यावेळी 500 दारूच्या बाटल्या व एक दुचाकी असा एकूण 1 लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मनोहर श्रावण मारबते (वय 40, रा.ढिवरटोली, गोरेगााव) असे आरोपीचे नाव आहे.
जिल्ह्यातील अवैधरित्या चालणारे धंदे व बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करण्याचे तसेच अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी विशेष पथकास आदेशित केले आहे. दरम्यान, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथकाने शहरातील यादव चौक, हनुमान मंदिर परिसरातील तलाव भागात सापळा रचून 24 जानेवारी रोजी 9.30 वाजताच्या सुमारास मनोहर श्रावण मारबते रा. ढिवरटोला, ता. गोरेगाव याला एक्टिवा दुचाकीने 500 नग दारूच्या बाटलांसह अटक केली. त्याच्याकडून 90 एम.एल.ने भरलेल्या 500 नगर देशी दारूच्या बाटल्या किंमत 17 हजार 500 रुपये व दुचाकी किंमत 1 लाख असा एकूण 1 लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मनोहर श्रावण मारबते याच्याविरोधात गोंदिया शहर पोलीस ठाण्यात कलम 65 (ई),77(अ),80, 81, 82 महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या विशेष पथकामधील पोलीस हवालदार सुजित हलमारे, पोलीस हवालदार महेश मेहर, पोलीस नाईक शैलेष कुमार निनावे, दयाराम घरत, पोलीस शिपाई हरिकृष्णा राव यांनी केली.